breaking-newsमुंबई
आदेश बांदेकरांच्या कार्यक्रमाचे शूटिंग सुरू असताना सेटला आग
चेंबूर येथील एसेल स्टुडिओला शनिवारी दुपारच्या सुमारास आग लागली. या स्टुडिओमध्ये ‘झिंग झिंग झिंगाट’ मालिकेचे शूटिंग सुरू होते. ही आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या आगीत मालिकेच्या सेटचे मोठे नुकसान झाले. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
एसेल स्टुडिओमध्ये आदेश बांदेकर यांच्या ‘झिंग झिंग झिंगाट’ मालिकेचे सेट आहे. या मालिकेचे शूटिंग सुरू होते आणि सेटवर जवळपास १०० ते १५० लोक उपस्थित होते. त्याचवेळी अचानक ही आग लागली. ही आग ताबडतोब आटोक्यात आणली गेली पण यामध्ये सेटचे नुकसान झाले, अशी माहिती बांदेकरांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.