breaking-newsक्रिडा

आदित्य, स्पर्श, पियुश आणि अभिराम यांचा मुख्य फेरीत प्रवेश

एमएसएलटीए योनेक्‍स 12 वर्षाखालील टेनिस स्पर्धा

पाचगणी  – आदित्य यादव, स्पर्श मुर्गे, पियुश जाधव, अभिराम निलाखे या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करताना येथे सुरु असलेल्या रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए योनेक्‍स सनराईज रवाईन हॉटेल 12 वर्षाखालील सुपर सिरीज्‌ टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटाच्या मुख्य फेरीत प्रवेश केला आहे.

पाचगणी येथील रवाईन हॉटेल येथील टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत अंतिम पात्रता फेरीत मुलांच्या गटात आदित्य यादवयाने सूर्या काकडेचा 6-2, 6-1 असा एकतर्फी पराभव करत विजयी आगेकूच नोंदवली. तर, दुसऱ्या सामन्यात स्पर्श मुर्गे याने नंदन गायकवाडचा 6-2, 6-1 असा पराभव करून मुख्य फेरीत धदक मारली आहे.

तर अन्य एका सामन्यात अभिराम निलाखेयाने अक्षोभया गुप्ताचा 6-0, 6-0 असा सरळ सेट मध्ये पराभव करताना स्पर्धेची मुख्य फेरीगाठली आहे. तर, अखेरच्या सामन्यात पियुश जाधवयाने अर्जुन प्रधानचा 6-0, 6-0 असा एकतर्फी पराभव करताना चमकदार कामगिरीसह मुख्य फेरीत प्रवेश केला.

सविस्तर निकाल : अंतिम पात्रता फेरी

आदित्य यादव वि.वि. सूर्या काकडे 6-2, 6-1,

स्पर्श मुर्गे वि.वि. नंदन गायकवाड 6-2, 6-1,

अभिराम निलाखे वि.वि. अक्षोभया गुप्ता 6-0, 6-0,

पियुश जाधव वि.वि. अर्जुन प्रधान 6-0, 6-0

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button