breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

आता व्हॉट्सऍपवरून पैसेही पाठवता येणार

नवी दिल्ली – व्हॉट्सअ‍ॅपवरून पैसे पाठवण्याची सुविधा सुरू होणार, अशी चर्चा मागील काही वर्षांपासून सुरू होती. ही चर्चा अखेर खरी ठरली आहे. आता भारतात व्हॉट्सअ‍ॅपवरून केवळ संवादच नाही, तर आर्थिक व्यवहारही करता येणार आहेत. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात एनपीसीआयने गुरुवारी यासाठी व्हॉट्सअ‍ॅपला परवानगी दिली. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपवरून पैसेही पाठवता येणार आहेत. WhatsApp UPI आधारित ही पेमेंट सेवा असून यापूर्वीच तिची चाचणीही झालेली आहे.

व्हॉट्सअ‍ॅपने याबाबत आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘आजपासून देशभरात व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांना व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून पैसे पाठवता येणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपवरून पैसे पाठवण्याचा अनुभव मेसेज पाठवण्याइतकाच सोपा असेल’, असा दावा कंपनीने केला आहे. तसेच व्हॉट्सअ‍ॅपने पेमेंट सेवेसाठी पाच मोठ्या बँकांसोबत करारही केला आहे. यात ICICI bank, HDFC bank, Axis bank, SBI आणि JIO Payments bank यांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे व्हॉट्सअ‍ॅपवरून UPI सिस्टीमला सपोर्ट करणाऱ्या कोणत्याही अ‍ॅपवर पैसे पाठवता येणार आहेत. म्हणजे समोरची व्यक्ती व्हॉट्सअ‍ॅप पेमेंटचा वापर करत नसेल तरीही आपण तिला पैसे पाठवू शकतो. भारतात व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट सेवा दहा प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध असणार आहे. जर वापरकर्त्याच्या व्हॉट्सअ‍ॅपमध्ये पेमेंटचा पर्याय असेल तरच त्याचा वापर करता येणार आहे. हा पर्याय नसेल तर व्हॉट्सअ‍ॅप अपडेट करून हा पर्याय बघता येणार आहे. तसेच व्हॉट्सअ‍ॅप पेमेंटचा वापर करण्यासाठी वापरकर्त्याजवळ डेबिट कार्ड असणे अनिवार्य आहे. हे डेबिट कार्ड UPIला सर्पोट करणारे हवे. व्हॉट्सअ‍ॅपवरून पैसे पाठविण्यासाठी वापरकर्त्याला व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट पर्यायावर जाऊन बँकेची निवड करायची आहे. त्यानंतर माहिती भरून सेवा सुरू करायची आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button