breaking-newsमुंबई

आता खाजगी कंत्राटदार वसूल करणार मालमत्ता कर

मालमत्ता कर थकबाकीसाठी पालिका वेगवेगळी शक्कल लढवत आहे. आधी मुंबई पालिकेनं दवंडी दिली नंतर मोठ्या व्यावसायिक थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई सुरु केली. पालिकेकडून एका आठवड्याभरात 3392 मालमत्ता कर थकवणाऱ्या मालमत्ता जप्त तसेच 200 थकबाकीदारांचे पाणी तोडण्याची देखील कारवाई करण्यात आली. मात्र आता ही कारवाई अधिक वेगानं करण्यासाठी खाजगी कंत्राटदार नेमण्याचा पालिकेचा विचार आहे.

खाजगी कंत्राटदार नेमल्यास कर वसूली अधिक वेगानं होईल असा मुंबई महानगरपालिकेचा दावा असला तरी महापालिकेकडे पुरेसे मनुष्यबळ आणि यंत्रणा असताना खाजगी कंत्राटदाराचाच आग्रह का? असा प्रश्न आता समोर येत आहे. महानगरपालिका सध्या ज्या गतीनं मालमत्ता कराची वसूली करत आहे त्या गतीनं मालमत्ता कर वसूलीचं लक्ष्य गाठलं जाऊ शकतं. मात्र, तरीही खाजगी कंत्राटदारांचा यातील सहभाग गैरव्यव्हारांनाही आमंत्रण देऊ शकतो.

गेल्या आठवड्यापासून महापालिकेने थकबाकीदारांवर कठोर कारवाईचा बडगा उगारताच सुरुवातीला कर भरण्यास टाळाटाळ करणा-या अनेकांनी मालमत्ता कर भरण्यास सुरुवात केली आहे. ज्यामुळे 10 कोटी असणारी दैनंदिन वसुली आता दररोज 40 ते 50 कोटींपर्यंत पोहचली आहे. यानुसार गेल्या आठवड्याभरातच 350 कोटी रुपयांचा भरणा थकबाकीदारांनी महापालिकेकडे केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button