breaking-newsपिंपरी / चिंचवड

ज्येष्ठांना आधार देण्याचे काम महापालिका करेल – महापौर राहुल जाधव

पिंपरी, (महा-ई-न्यूज) –  शहराच्या जडणघडणीत ज्येष्ठांचा मोलाचा वाटा असून शहरातील ज्येष्ठांना आधार देण्याचे काम पिंपरी-चिंचवड महापालिका करेल, अशी ग्वाही महापौर राहुल जाधव यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने निवृत्ती वेतनधारक दिनानिमित प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे आयोजित केलेल्या मेळाव्याचे उदघाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नगरसदस्य सुरेश भोईर, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, पिंपरी-चिंचवड सेवा निवृत्त सेवक परिषदेचे अध्यक्ष दिपक रांगणेकर, भगवान काणपूरकर, श्रीराम पोटे, सावळाराम साईल, पद्माकर जनपंडित, श्रीराम परबत, श्रीकांत मोने, कुमुदिनी घोडके, व्यंकटेश पांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

महापौर जाधव म्हणाले, सेवानिवृत्त वेतनधारक करत असलेल्या मागण्या आमच्या व शहराच्या भल्यासाठीच आहेत. तुमच्या संस्कारातून घडल्यामुळेच शहराचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. निवृत्त वेतनधारकांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी मनपा कटिबद्ध आहे. निवृत्त सेवकांसाठीच्या कार्यासाठी आवश्यक असलेल्या कार्यालयाला जागा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. यानंतर प्रा. श्याम भुर्के यांच्या विनोदी कार्यक्रमाने उपस्थितांना हास्यकल्लोळात नेले. विविध विनोदी किस्से त्यांनी सादर करून जुन्या स्मृतींना उजाळा दिला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button