breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आगामी महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी आक्रमक, सर्व अध्यक्षांची बैठकीत व्यूहरचना!

पिंपरी । प्रतिनिधी
महापालिकेच्या आगामी निवडणुकीत सत्तांतर करून पालिकेवर पुन्हा राष्ट्रवादीचा झेंडा लावण्याची तयारी पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसकडून तयार करण्यात आली. आज पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व सेल, महिला कार्यकारणी अध्यक्षाची बैठक खराडवाडी येथील शहर पक्ष कार्यालयात घेण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आगामी महापालिका निवडणुकीसाठी मोठी व्यूहरचना आखण्यात आली.

यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी सर्व सेलच्या अध्यक्षाना पक्षाची महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीती समजावून सांगितली. पक्षनेते राजू मिसाळ, महिला अध्यक्ष वैशालीताई काळभोर, संघटक सचिव माजी नगरसेवक अरुण बोराडे, लीगल सेलचे अध्यक्ष ऍड. गोरक्ष लोखंडे, ओबीसी सेलचे अध्यक्ष विजय लोखंडे, अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष युसुफ कुरेशी, सामजिक न्याय विभागाचे अध्यक्ष विनोद कांबळे, कामगार सेलचे अध्यक्ष किरण देशमुख, व्यवस्थापन समिती अध्यक्ष शक्रुल्ला पठाण, ज्येष्ठ नागरिक सेलचे यतीन पारेख, बचत गट महासंघाच्या कविता खराडे, युवती अध्यक्ष वर्षा जगताप, सेवादल अध्यक्ष महेश झपके, व्हीजेएनटी सेल अध्यक्ष धीरज तामचीकर, झोपडपट्टी सेलचे अध्यक्ष उत्तम हिरवे, प्रवक्ते फजल शेख यावेळी उपस्थित होते.

या बैठकीत आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्येक सेलच्या अध्यक्षांनी प्रत्येक वॉर्ड प्रमाणे मीटिंग करण्याचे नियोजन करण्यात आले. या मिटींगमध्ये पदाधिकारी ते सामान्य कार्यकर्त्या सर्वांनी एकत्रित मतदारांपर्यंत कसे पोहचावे याचे नियोजन करण्यात आले. यामधील स्थानिक संघटना, पदाधिकारी व महिला बचत गटांना एकत्रित करून नियोजनाचा अहवाल शहराध्यक्ष प्रत्येक महिन्यात देण्याचे नियोजन करण्यात आले. त्याचबरोबर पालिका निवडणुकीसाठी प्रत्येक बुथ कमिटी व अध्यक्षांचा समन्वय करून बूथ कमिट्या सक्षमीकरण करण्याचे नियोजन यावेळी करण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button