breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आंतरराष्ट्रीय नाट्य व नृत्य महोत्सवात पिंपरीतील लेकींचा प्रथम क्रमांक

पिंपरी – कटक येथे संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय नाट्य व नृत्य महोत्सवात  पिंपरी-चिंचवडमधील सावित्रीच्या लेकींनी विविध नृत्यांचे सादरीकरण करून स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकविला.

 

ओरिसा राज्यातील कटक येथे उत्कल युवा सांस्कृतिक संघ, कटक जिल्हा प्रशासन आणि ओरिसा राज्य सांस्कृतिक व पर्यटन विभाग यांच्या वतीने आयोजित केलेल्या या समारंभात पिंपरी चिंचवड येथून गौरी घाडगे (भरत नाट्यम), रुचाली बोरोले (सेमी क्लासिक), ज्ञानेश्वरी साळुंके (.कोन्टेम ), गिरीजा शिंदे (फोक ग्रुप), श्रद्धा कोरे (क्लासिक), तन्वी एकदारी (बेली डान्स), विद्युलता खत्री (सेमी क्लासिकल तांडव), आदिती रानवडे (बॉलीवूड), रेवती तातुसकर (बॉलीवूड लावणी), इशा पोतदार, मैत्रेयी जोशी, प्रज्ञा गोरे, (ट्रीओ क्लासिकल) शर्वरी कुदळे, (फोक जोगवा क्लासिकल), वैष्णवी पाटील (फोक ग्रुप) यांनी भाग घेतला होता.

 

या महोत्सवात उत्पादन शुल्क व अर्थमंत्री शशीभूषण बेहरा यांच्या हस्ते पुरस्कार वितरीत करण्यात आले. यावेळी उत्कल युवासंघाचे अध्यक्ष प्रवा पटनाईक, कटकचे आमदार देबाशीश संमात्र्य, उत्कल युवा केंद्राचे अध्यक्ष डॉ. विजयनाथ सिंग, सचिव प्रो. कार्तिक चंद्र राव, उत्कल युवा संघाचे प्रमुख कार्तिक चंद्रधर, आदी  उपस्थित होते. उत्कल युवा संघाचे स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देऊन राष्ट्रीय नृत्य गरिमा पुरस्काराने तेजश्री अडिगे यांना गौरविण्यात आले. यावेळी विविध नृत्य प्रकार सादर करून नृत्य कलामंदिरच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाची रंगत वाढविली.

 

भारतातील चार जणांना व भारताबाहेरील चार जण यांचा समावेश होता. त्यापैकी भारतातील चार जणांमधून निगडी प्राधिकरणयेथील या महोत्सवात पिंपरी-चिंचवडमधून नृत्यकला मंदिरच्या 25 जणांचा ग्रुपचा सहभाग होता. तसेच या  होत्सवात देशातील काही कलावंतासह अफगाणिस्तान, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इराण, इटली, जपान, स्पेन,  मेक्सिको, मलेशिया, नेपाळ सौदी, अरेबिया, सिंगापूर, थायलंड येथील कलाकारांनी कला सादर केली. येथील कलाप्रेमींनी पुरस्कार प्राप्त कलावंतांचे अभिनंदन केले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button