breaking-newsराष्ट्रिय

असे करा व्हॉट्सअॅपचे स्टेटसमधील व्हिडिओ डाउनलोड

नवी दिल्ली:  व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्रामसारख्या सोशल साइटवर स्टेट्समध्ये अनेकजण व्हिडिओ ठेवत असतात. मात्र, एखादा व्हिडिओ आवडला तरी सेव्ह करता येत नसल्यामुळे अनेकांचा हिरमोड होतो. आता मात्र, व्हॉ़ट्स अॅप स्टेट्सवरील व्हिडिओ डाउनलोड करता येणार आहे.
व्हॉट्स अॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम यांनी २०१७मध्ये ‘स्टोरी’ फिचर लाँच केले होते. त्यावेळी व्हॉट्स अॅपवर फक्त टेक्सटमध्ये स्टेट्स पोस्ट करता येत असे. त्यानंतर फोटो, व्हिडिओ अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली.व्हॉट्स अॅपवर तुम्ही जेव्हा एखादी स्टेट्स स्टोरी पाहता त्यावेळी ती फोनमध्ये डाउनलोड होते. मोबाइलमधील .statuses या फोल्डरमध्ये ही स्टोरी जाते. मात्र, ही हिडन फाइल असल्यामुळे फाइल मॅनेजरमध्ये ही फाइल दिसत नाही. त्यासाठी या फोल्डरला अनहाइड करावे लागेल. फोल्डरला अनहाइड करण्यासाठी स्टोरेजमध्ये जाऊन व्हॉट्स अॅप क्लिक करावे. त्यानंतर उजवीकडे सेटिंगवर टॅप करुन Show Unhide Files’ वर क्लिक करावे. त्यानंतर स्टेट्समधील व्हिडिओ, फोटो सेव्ह करता येतील.

प्ले स्टोरवर काही अॅप्स आहेत. ज्याच्या मदतीने स्टेट्समधील व्हिडिओ सेव्ह करता येतील. Story Saver for WhatsApp नावाचे अॅप सध्या लोकप्रिय आहे. हे अॅप थेट व्हॉट्स अॅपला कनेक्ट होते. त्यानंतर हवी असलेली स्टेट्स स्टोरी अपलोड करता येऊ शकते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button