breaking-newsमहाराष्ट्र

अवनी वाघिणीच्या शिकारीसाठी वापरण्यात आली बेकायदा बंदूक

अवनी वाघिणीच्या शिकारीचा मुद्दा राज्यभर गाजला. याप्रकरणी राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाचा अहवाल समोर आला आहे. ज्यानुसार शिकारी असगर अलीच्या मुलाने अवनीच्या शिकारीसाठी बेकायदा बंदूक वापरल्याचे समोर आले आहे. एवढंच नाही तर असगरने तीन कायद्यांचे उल्लंघन केल्याचेही या अहवालात म्हटले आहे.  भारतीय शस्त्रास्त्र कायदा Indian Arms Act 1958 च्या ३ (१), इंडियन व्हेटरनरी काऊंसिल अॅक्ट १९८४, वन्यजीव रक्षक कायदा १९७२ आणि राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाच्या Standard Operative Procedure चा भंग झाल्याचे मुद्दे या अहवालात नमूद करण्यात आले आहेत.

अवनी वाघिणीच्या शिकारीसाठी वापरण्यात आणलेली बंदूकही बेकायदा होती असेही या अहवालात म्हटले गेले आहे. अवनीला ज्या बंदुकीने ठार करण्यात आले ती बंदूक अजगरच्या मालकीची होती. असे असताना त्याच्या मुलाने शफाअत अली खानने कशी काय वापरल्याचे या अहवालात म्हटले गेले आहे.

हा अहवाल राज्याचे मुख्य सचिव दिनेश कुमार जैन आणि राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक ए. के. मिश्रा यांना सादर करण्यात आला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव जंगल भागात १३ जणांना अवनी वाघिणीने ठार केलं. टी १ अवनीला त्याच कारणामुळे ठार करण्यात आलं. पण अवनीची शिकार म्हणजे थंड डोक्याने कट रचून केलेली हत्या आहे असा थेट आरोप वन्यजीव प्रेमींनी केला आहे. तसेच वनविभागाने अवनीच्या या शिकारीच्या मोहिमेबाबत अजिबात पारदर्शकता ठेवली नाही असाही आरोप होतो आहे.

अवनीच्या शवविच्छेदनाचा अहवाल समोर येईल तेव्हा इतर गोष्टी स्पष्ट होतीलच. या प्रकरणातला फॉरेन्सिक अहवालही लवकरात लवकर समोर आणला जावा अशीही मागणी होते आहे. अवनीचा शोध सुरु असताना ती शोध पथकाला दिसली. अवनी दिसताक्षणी तिला वन विभागाने जेरंबद करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यावेळी तिने पथकाच्या दिशेने चाल केली. ती दिसताच शार्प शूटर अजगर अलीने आणि त्याच्या मुलाने तिच्यावर गोळ्या झाडल्या. ज्यामध्ये अवनीचा जागीच मृत्यू झाला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button