breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

अल्पवयीनासह पाच जणांना बलात्कारप्रकरणी अटक

मुंबई : मानखुर्द परिसरात राहणाऱ्या विधवेवर गेल्या आठवडय़ात गुरुवारी सामूहिक बलात्कार करणाऱ्या पाचही आरोपींना मानखुर्द पोलिसांनी अटक केली असून त्यांपैकी एक अल्पवयीन आहे.

ही महिला आपल्या मुलांसह मानखुर्द भागात राहते. ती गुरुवारी (१७ जानेवारी) सायंकाळी जवळच्या परिसरात एका कार्यक्रमाला गेली होती. कार्यक्रम संपल्यानंतर रात्री अकराच्या सुमारास घरी येत असताना तिच्यावर तिघांनी बलात्कार केला. या धक्क्यातून सावरत ही महिला रस्त्यालगत रडत होती. हे पाहून तेथून जाणाऱ्या दोघांनी तिला हटकले. तिने त्यांना घडलेला प्रकार सांगितला. परंतु तिला मदत करण्याऐवजी त्यांनीही तिच्यावर बलात्कार केला. ती कशीबशी  रात्री उशिरा घरी पोहोचली. दुसऱ्या दिवशी तिने मानखुर्द पोलीस ठाण्यात जाऊन घडलेला प्रकार सांगितला. तिची प्रकृती नाजूक असल्याने पोलिसांनी तिला एका रुग्णालयात दाखल केले आणि आरोपींचा माग काढायला सुरुवात केली. त्याच दिवशी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली.

या महिलेला सोमवारी रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी तिच्याकडून अन्य आरोपींची माहिती घेतली. तिने केलेल्या वर्णनावरून पोलिसांनी आणखी तीन आरोपींना अटक केली. त्यांपैकी एक अल्पवयीन असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन बोबडे यांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button