breaking-newsआंतरराष्टीय

अमेरिकेत प्लाझ्मा थेरपीद्वारे होणार कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार

वॉशिंग्टन – कोरोनाचा सर्वाधिक फटका हा अमेरिकेला बसला असून त्या ठिकाणी मृतांची संख्याही अधिक आहे. कोरोनाबाधितांची ही वाढती संख्या पाहता अमेरिकेने आता प्लाझ्मा थेरपीद्वारे रुग्णांवर उपाचार करणार असल्याची घोषणा केली आहे. कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी आता प्लाझ्मा थेरेपीचा वापर करण्यात येईल, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले. अमेरिकेच्या एफडीएनेदेखील आपत्कालिन परिस्थितीत कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी प्लाझ्मा थेरेपीचा वापर करण्याची परवानगी दिली आहे. याद्वारे ३० ते ५० टक्क्यांपर्यंत कोरोनाबाधितांचे प्राण वाचवले जाऊ शकतात, असा दावाही करण्यात आला आहे.

अमेरिकेचे आरोग्यमंत्री अॅलेक्स अझार आणि एफडीचे आयुक्त स्टिफन हेन यांनी ही घोषणा ऐतिहासिक असल्याचे म्हटले आहे. तर डोनाल्ड ट्रम्प यांनी प्लाझ्मा थेरेपीने करण्यात येणारे उपचार सुरक्षित असल्याचे सांगितले. कोरोनावर मात केलेल्या रुग्णांचा प्लाझ्मा घेऊन तो कोरोनाबाधितांना दिला जाणार आहे. त्यानंतर रुग्णांची बरे होण्याची शक्यता वाढणार असल्याचे हेन यांनी सांगितले. कॉन्वालेसंट प्लाझ्मा थेरेपीमुळे कोरोनामुळे होणारे मृत्यू ३० ते ५० टक्क्यांपर्यंत कमी करण्यास मदत मिळेल, असा दावा मेयो क्लिनिकच्या एका सर्वेक्षणाद्वारे करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button