breaking-newsआंतरराष्टीय

अमेरिकेत कोरोनामुळे 1 लाख 32 हजार 313 जणांचा मृत्यू

वॉशिंग्टन – जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला असून इतर देशांच्या तुलनेत अमेरिकेतील मृत्यूचे प्रमाण मोठे आहे. अमेरिकेत आतापर्यंत 29 लाख 35 हजार 427 जणांना कोरोनाची बाधा असून 1 लाख 32 हजार 313 जणांचा बळी गेला आहे. तब्बल 180 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे अमेरिकेवर मोठे संकट निर्माण झाले आहे.

तर अमेरिकेनंतर दुसऱ्या क्रमांकावर ब्राझिल आहे. ब्राझिलमध्ये आतापर्यंत 64 हजार 365 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 15 लाख 78 हजार 376 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापाठोपाठ रशिया, भारत, पेरू, स्पेनमध्ये कोरोना रुग्ण आढळले आहेत. जगभरात कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात धुमाकूळ सुरु आहे. गेल्या 24 तासांत जगात कोरोनाचे 1 लाख 89 हजार 828 नवे रुग्ण आढळले असून 4 हजार 478 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

त्यामुळे एकूण मृत्यूचा आकडा 5 लाख 32 हजार 856वर पोहचला आहे. तर एकूण 1 कोटी 13 लाख 71 हजार 646 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तसेच आतापर्यंत 64 लाख 32 हजार 994 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button