breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

#Covid-19: पवित्र रमजान महिना साजरा करण्याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांचे आदेश..!

पिंपरी |

कोरोना विषाणूमुळे (कोविड-१९) उद्भवलेल्या संसर्गजन्य आजारामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात आपत्कालीन उपाय योजना लागू करण्याची व त्यावर प्रतिबंधात्मक उपाय योजना आखण्याची आवश्यकता झाली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना विषाणू बाधित पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या अधिक वेगाने वाढत आहे. येत्या काळात पिंपरी चिंचवड शहरात रुग्णांची संख्या आणखीन वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाराष्ट्र कोविड-१९ उपाययोजना नियम २०२० अन्वये कोविड-१९ च्या प्रसारास पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत आयुक्त राजेश पाटील यांनी दि.१७.०४.२०२१ ते दि.१३ किंवा दि.१४.०५.२०२१ पर्यन्त पवित्र रमजान महिना साजरा करण्याबाबत खालील प्रमाणे आदेश निर्गमित केले आहेत.

हे आहेत आदेश –

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी पवित्र रमजान महिन्यात मुस्लीम बांधवांनी नियमित नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तारसाठी मशिदीमध्ये अथवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता सर्व धार्मिक कार्यक्रम आपापल्या घरातच साजरे करावेत. नमाज पठणाकरिता मशिदीत तसेच मोकळ्या जागेत एकत्र येऊ नये.

▪ सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता सोशल डिस्टन्सीग (Social Distancing) व स्वच्छतेच्या नियमांचे (मास्क व सॅनिटायझर इत्यादी) पालन करून पवित्र रमजान महिना अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात यावा.

▪ या पवित्र महिन्यात मुस्लीम बांधव ३० दिवस दररोज पहाटेपासून उपवास ठेवतात व संध्याकाळी मगरीब नमाज पूर्वी उपवास सोडतात. या सेहरी व इफ्तारच्या वेळी अनेक फळ, अन्नपदार्थ विक्रेते या ठिकाणी गर्दी होवू नये यासाठी संबंधित प्रभागाचे सहायक आयुक्त/क्षेत्रीय अधिकारी व पोलीस प्रशासन यांनी योग्य ती उपाययोजना करावी.

▪पवित्र रमजान महिन्यात शेवटच्या शुक्रवारी दुवा पठण (अलविदा जुम्मा) करण्याची प्रथा आहे. त्यासाठी मुस्लीम बांधव मोठ्या प्रमाणात मशिदीमध्ये येऊन दुवा पठण करतात. परंतु यावेळी कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव पाहता कोणीही मशिदीमध्ये दुवा पठणाकरिता एकत्र जमू नये, आपापल्या घरातच दुवा पठण करावे.

▪शब-ए-कदर ही पवित्र रात्र रमजान महिन्यात २६ व्या दिवशी साजरी करण्याची प्रथा आहे. या निमित्ताने मुस्लीम बांधव तरावीह नमाज संपल्यानंतर आपल्या विभागातील मशिदीमध्ये रात्रभर कुराण पठण व नफील नमाज अदा करतात. परंतु या वर्षी सर्व मुस्लीम बांधवांनी सदर धार्मिक कार्यक्रम घरात राहूनच साजरी करावेत.

▪धार्मिक स्थळे बंद असल्याने वाझ कार्यक्रमाचे आयोजन शासनाच्या नियमांचे पालन करून बंद जागेत शक्यतो ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात यावेत.

▪कोविड-१९ या विषाणूच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात कलम १४४ (संचारबंदी) लागू असल्याने फेरीवाल्यांनी रस्त्यावर स्टॉल लावू नयेत व नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये.

▪ या पवित्र रमजान महिन्यात कोणत्याही प्रकारे मिरवणुका, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक अथवा राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये.

▪धार्मिक स्थळे बंद असल्याने मुस्लीम समाजातील धर्मगुरू, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून पवित्र रमजान महिना साधेपणाने साजरा करण्याच्या अनुषंगाने जनजागृती करण्यात यावी.

▪या संदर्भात महाराष्ट्र शासन, गृह विभाग, यांनी दि. १२ एप्रिल २०२१ रोजी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील.

▪ कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संबंधित सहायक आयुक्त / क्षेत्रीय अधिकारी व पोलीस प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे, संदर्भीय आदेशान्वये वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश / मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील. केंद्र सरकार / महाराष्ट्र शासन / पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने यापूर्वी निर्गमित केलेले आदेश / मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील.

कोविड-१९ च्या प्रतिबंधासाठी केंद्र सरकार / राज्य शासन आणि या कार्यालयाद्वारे वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशांचे, मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ ते ६० तसेच भारतीय दंड संहितेचे कलम १८८ नुसार, अन्य कायदेशीर तरतुदीनुसार कारवाईस पात्र राहील. सदर आदेश दि . १७.०४.२०२१ पासून पुढील आदेशापर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात लागू राहतील असे आदेश पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील यांनी दि.१७.०४.२०२१ रोजी दिले आहेत.

वाचा- #Covid-19: JEE Mainची परीक्षा ढकलली पुढे; नवीन तारीख करणार जाहीर

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button