breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल

न्यूयॉर्क – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. त्यांना वॉल्टर रीड हॉस्पिटलला दाखल करण्यात आले आहे, तिथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांना देखील कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. ट्रम्प यांचे डॉक्टर सीन कॉनली यांनी सांगितलं की गुरुवारी सायंकाळी त्यांना कोरोना झाल्याचड समोर आले होते. काल त्यांनी कोरोना झाल्याचे सांगत क्वारंटाईन होत असल्याचे म्हटले होते.

एक व्हिडीओ ट्वीट करत ट्रम्प यांनी म्हटले आहे की, ‘मी सर्वांचे आभार मानतो, मी वॉल्टर रीड हॉस्पिटलला चाललो आहे .मला वाटते मी ठीक आहे मात्र सर्व गोष्टी व्यवस्थित व्हायला हव्यात म्हणून मी दवाखान्यात दाखल होत आहे. फर्स्ट लेडी देखील ठीक आहेत. मी सर्वांचे पुन्हा आभार मानतो, हे प्रेम कधीही विसरणार नाही’.

कोरोनाची बाधा झाल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत: यासंदर्भात ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली होती. ट्विटमध्ये त्यांनी म्हटले होते की, मी आणि माझी पत्नी मेलेनियाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. आम्ही तात्काळ क्वारंटाईन झालो आहोत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button