breaking-newsक्रिडा

अमेरिकन ओपन टेनिस : भारताचे आव्हान संपुष्टात

न्यूयॉर्क – ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेतील एक मानाची समजली जात असलेल्या अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे. पुरुष दुहेरी गटात भारताच्या रोहन बोपण्णा व कॅनडाचा सहकारी खेळाडू डेनिस शापोलव्ह या जोडीला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला.

या सामन्यात नेदरलॅंड्‌सचा जीन ज्युलियन रोजर व रुमानियाचा होरिया टेकू या जोडीने 6-5, 7-5 असे पराभूत केले. या जोडीने बोपण्णा व शापलोव्ह जोडीला सुरुवातीपासूनच दडपणाखाली ठेवण्यात यश मिळवले. पहिला सेट अटीतटीचा झाला. त्यात दोन्ही जोड्यांनी एकमेकांच्या सर्व्हिस सहज भेदल्या. मात्र, निर्णायक गुण मिळविण्यात बोपण्णा व शापलोव्ह जोडीला अपयश आले व हा सेट त्यांना गमवावा लागला. दुसरा सेटही असाच रंगला.

दोन्ही जोड्या एकमेकांवर वर्चस्व राखण्यासाठी आक्रमक खेळ करत होत्या. बोपण्णा व शापलोव्ह जोडीने बेसलाइनवरून खेळ करण्याला प्राधान्य दिले मात्र, त्यांना मॅच पॉइंटही वाचवता आले नाहीत व हा सेटही त्यांनी गमावला. त्यांच्या पराभवाने या स्पर्धेत भारताचे एकमात्र आव्हान बोपण्णाच्या रूपाने टिकले होते तेदेखील संपुष्टात आले.

सेरेना उपांत्यपूर्व फेरीत

अमेरिकेची अनुभवी टेनिसपटू सेरेना विल्यम्स हिने सलग बाराव्यांदा या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सेरेनाने ग्रीसच्या मारिया सक्कारीचा 6-3, 6-7, 6-3 असा पराभव केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button