मनोरंजन

अमेय वाघ आणि सिद्धार्थ जाधवचा क्रिकेटर ब्राव्हो आणि पोलार्डसारखा डान्स, पहा व्हिडीओ…

मल्टिस्टारर मराठी चित्रपट ‘धुरळा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोशल मीडियावर सध्या याच चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. याच चित्रपटाच्या शुटींगच्या दरम्यान अभिनेता अमेय वाघ आणि सिद्धार्थ जाधव यांनी केलेल्या भन्नाट डान्सचा व्हिडीओ अमेयनं आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केलाय.

या व्हिडीयोत या दोघांनाही एका गाण्यावर डान्स केला आहे. आणि चित्रपटाचे लेखक क्षितीज पटवर्धनने हा व्हिडीओ शूट केला आहे. ‘जेव्हा धुरळाच्या शूटिंगदरम्यान माझ्या आणि सिद्धार्थच्या अंगाज ब्राव्हो आणि पोलार्ड संचारले’, असं कॅप्शन अमेयने या व्हिडीओला दिलं आहे. या कॅप्शनप्रमाणेच हे दोघं क्रिकेटर ब्राव्हो आणि पोलार्डसारखे नाचताना पाहायला मिळत आहेत.

सिद्धार्थ आणि अमेय दोघंही त्यांच्या विनोदी अभिनयासाठी खास ओळखले जातात. पडद्यामागेही अनेकदा त्यांचा विनोदी अंदाज चाहत्यांना पाहायला मिळतो. आगामी ‘धुरळा’ चित्रपटात या दोघांची भूमिका नेमकी काय आहे हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी ३ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अनेक हरहुन्नरी कलाकार आणि त्यांचे एकापेक्षा एक अशा भन्नाट भुमिका यामुळे हा चित्रपट पहायचा अनुभव प्रेक्षकांचा नक्कीच वेगळा असणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button