breaking-newsआंतरराष्टीय

अमर्त्य सेन यांच्यानंतर दुसऱ्यांदा अर्थशास्त्राचे नोबेल

स्टॉकहोम : भारतीय – अमेरिकी अर्थशास्त्रज्ञ अभिजित बॅनर्जी यांना सोमवारी अर्थशास्त्राचे नोबेल मिळाल्याने भारतीय व भारतीय वंशाच्या नोबेल मानकऱ्यांमध्ये त्यांचा समावेश झाला आहे. बॅनर्जी यांच्यासमवेत त्यांच्या फ्रेंच अमेरिकी पत्नी एस्तेर डफलो व अमेरिकी अर्थशास्त्रज्ञ मायकेल क्रेमर यांना अर्थशास्त्राचे नोबेल मिळाले आहे.

रवींद्रनाथ टागोर यांना १९१३ मध्ये पहिल्यांदा साहित्याचे नोबेल मिळाले होते त्यात गीतांजलीसह त्यांच्या सर्वंकष साहित्याचा गौरव करण्यात आला होता. त्यानंतर १९३० मध्ये भौतिकशास्त्राचे नोबेल  चंद्रशेखर व्यंकट रमण यांना रामन परिणामासाठी मिळाले.  भारतीय वंशाचे अमेरिकी वैज्ञानिक हरगोबिंद खुराना यांना १९६९ मध्ये वैद्यकशास्त्रातील नोबेल  मिळाले होते. त्यावेळी इतर दोन जण सह मानकरी होते. जनुकीय संकेतावलीचा अर्थ व त्याचे प्रथिन संश्लेषण असा त्यांचा संशोधनाचा विषय होता.

रोम कॅथॉलिक ख्रिश्चन धर्मगुरू मदर तेरेसा यांना १९७९ मध्ये शांततेचे नोबेल मिळाले. त्या अल्बानियन असल्या तरी त्यांचे नागरिकत्व भारतीय होते.  मानवतेच्या कल्याणासाठी त्यांनी केलेले कार्य अतुलनीय होते. भारतीय वंशाचे अमेरिकी वैज्ञानिक सुब्रमण्यम चंद्रशेखर यांना १९८३ मध्ये भौतिकशास्त्राचे नोबेल विल्यम फाउलर यांच्यासमवेत ताऱ्यांच्या उत्क्रांतीवरील संशोधनासाठी मिळाले होते. १९९८ मध्ये अर्थशास्त्राचे नोबेल कोलकाता येथे जन्मलेले अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांना कल्याणकारी अर्थशास्त्रातील योगदानासाठी मिळाले होते. जन्माने भारतीय असलेले  व्यंकटरमण रामकृष्णन यांना २००९ मध्ये इतर दोघांसमवेत रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार रायबोसोमवरील संशोधनासाठी मिळाला होता. २०१४ मध्ये कैलाश सत्यार्थी यांना पाकिस्तानच्या मलाला युसूफझाई यांच्यासमवेत शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला, मुलांचे शोषण व त्यांचे हक्क  या क्षेत्रात त्यांनी काम केले.

नोबेलचे भारतीय मानकरी

* १९१३   रवींद्रनाथ टागोर – साहित्य

* १९३० चंद्रशेखर व्यंकट रमण- भौतिकशास्त्र

* १९६९- हरगोविंद खुराणा- वैद्यकशास्त्र

* १९७९- मदर तेरेसा – शांतता

* १९८३- सुब्रमण्यम चंद्रशेखर  भौतिकशास्त्र

* १९९८ अमर्त्य सेन – अर्थशास्त्र

* २००९ व्यंकटरमण रामकृष्णन- रसायनशास्त्र

* २०१४- कैलाश सत्यार्थी – शांतता

* २०१९ – अभिजित बॅनर्जी- अर्थशास्त्र

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button