breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

अभिनेता शशांक केतकरच्या घरी लवकरच नव्या पाहुण्याचं आगमन

मुंबई – मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता शशांक केतकर याच्या घरी लवकरच नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. आज नाताळचं निमित्त साधून त्याने ही गुड न्यूज शेअर करत आपल्या चाहत्यांना सुखद धक्का दिलाय. त्याच्या या पोस्टनंतर चाहत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

‘सांताक्लॉज येतो आणि आपल्यावर भेटवस्तूंचा वर्षाव करतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहेच पण सांताक्लॉजने दिलेल्या भेटवस्तूंपैकी एखादी भेटवस्तू इतकी सुंदर असू शकते याची मात्र आम्हाला कल्पना नव्हती. तुम्हा सगळ्यांना आमच्या तिघांकडून हॅपी हॉलिडे आणि नाताळच्या शुभेच्छा’, अशी पोस्ट करत शशांकने गोड बातमी दिली आहे.

दरम्यान, येत्या नव्या वर्षात अनेक सेलिब्रिटींच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. यात अभिनेत्री धनश्री काडगांवकर, करीना कपूर खान, अनुष्का शर्मा यांच्याही घरी नव्या सदस्याचं आगमन होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button