breaking-newsमनोरंजन

अभिनयानंतर आलियाची पावले निर्मिती क्षेत्राकडे!

आपल्या सौंदर्यामुळे आणि उत्कृष्ट अभिनयामुळे प्रेक्षकांना भूरळ घालणारी अभिनेत्री आलिया भट्ट लवकरच निर्मिती क्षेत्रात पदार्पण करणार आहे. अभिनयानंतर आलियाने तिचा मोर्चा निर्मिती क्षेत्राकडे वळवला असून लवकरच ती स्वत:च प्रोडक्शन हाऊस सुरु करणार आहे. आलियाने एका मुलाखतीमध्ये स्वत: याविषयीची माहिती दिली आहे.

“कलाविश्वामध्ये अभिनयाची चुणूक दाखविल्यानंतर मी आता निर्मितीक्षेत्रात पदार्पण करत आहे. लवकरच माझं स्वत:च प्रोडक्शन हाऊस सुरु होणार असून Eternal Sunshine Productions असं माझ्या प्रोडक्शन हाऊसचं नाव असणार आहे. सध्या या निर्मिती संस्थेचं काम सुरु आहे. चित्रपटांची निर्मिती करावी असं माझं लहानपणापासूनच स्वप्न होतं. हे स्वप्न लवकरच सत्यात उतरणार आहे. जे चित्रपट मला पाहायला आवडतील अशाच स्वरुपाच्या चित्रपटांच्या निर्मितीकडे माझा कल असेल”,असं आलियाने ‘डेक्कन क्रोनिकल’ला सांगितलं.

पुढे ती असंही म्हणते, “नुकतंच मी एक अपार्टमेंट विकत घेतलं आहे. मात्र हे अपार्टमेंट घेतल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आलं होतं. काहींच्या मते मी या नव्या घरात शिफ्ट होणार असल्याचं सांगण्यात येत होतं. परंतु असं काहीच होणार नाहीये. मी माझ्या घरांतल्यांना सोडून वेगळं राहू शकत नाही. त्यामुळे या चर्चांमध्ये तथ्य नाही. तसंच हे नवी अपार्टमेंट मी माझ्या प्रोडक्शन हाऊसच्या ऑफिससाठी घेतलं आहे. माझं नवीन ऑफिस या ठिकाणी असेल”.

दरम्यान, आलियाने ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटामुळे नावारुपाला आलेली आलिया सध्या बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे. आलियाची मुख्य भूमिका असलेले ‘राझी’, ‘गली बॉय’ हे चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर गाजताना दिसत आहेत.

zzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzz

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button