breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

अभिताभ बच्चन यांच्या पहिल्या वहिल्या फोटोशुटमधला हा फोटो पाहिलात का ?

 बॉलिवूडचे महानायक अभिताभ बच्चन हे सोशल मीडियावर सर्वाधिक सक्रिय असतात. अनेकदा ते आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जुने फोटो प्रेक्षकांच्या भेटीला आणतात. यावेळी बच्चन यांनी आपल्या पहिल्या वहिल्या फोटोशूटची झलक प्रेक्षकांसोबत शेअर केली आहे. 

कलाकाराचं फोटोशूट हे नेहमीच चर्चेत असतं, बच्चन यांनी १९६९ साली चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं होतं, त्यावेळी एका मासिकासाठी त्यांनी हे फोटोशूट केलं होतं. बच्चन यांनी आपल्या सोशल मीडियावर त्या फोटोशूटचा फोटो शेअर करुन जुनी आठवण जागवली आहे. 

‘हा माझ्या सर्वात पहिल्या फोटोशूटमधला फोटो आहे, १९६९ सालचा हा फोटो आहे, मी  स्टार अँड स्टाइल या त्याकाळच्या आघाडीच्या मासिकासाठी फोटोशूट केलं होते. मी अतिशय लाजरा बुजरा होतो मी स्टारही नव्हतो आणि माझ्याजवळ स्टाइलही नव्हती, मात्र मासिकाची पत्रकार देवयानीला मात्र त्यात दोन्ही दिसत होते’, असं बच्चन यांनी लिहिलं आहे. बच्चन यांची पोस्ट सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button