breaking-newsपिंपरी / चिंचवड

सरकारचे आदेश धाब्यावर बसवणा-या ३ हजार ७०० जणांना पोलिसांचा दणका

पिंपरी| महाईन्यूज| प्रतिनिधी

लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्या 199 जणांवर पोलिसांनी काल गुन्हे दाखल केले आहेत. आत्तापर्यंत तीन हजार 700 जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

करोनाचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित केले आहे. या लॉकडाऊनची मुदत पुन्हा 3 मे पर्यंत वाढविण्यात आली आहे.

लॉकडाऊन सोबतच संचारबंदीचे आदेशही प्रशासनाने दिले आहेत. मात्र शासनाच्या या आदेशाकडे दुर्लक्ष करीत दुकाने सुरू ठेवणाऱ्या, संचारबंदी आदेशाचा भंग करून मोकाट फिरणाऱ्या तसेच मास्क न वापरणाऱ्यांच्या विरोधात भा. द. वि. कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात येत आहे. तरीदेखील नागरिक काहीही कारण सांगून घराबाहेर पडत आहेत. अशांवर पोलिसांनी आणखी कडक कारवाई करण्यास सुरवात केली आहे.

पिंपरी – 01
चिंचवड – 24
भोसरी – 13
एमआयडीसी भोसरी – 17
निगडी – 16
दिघी – 22
आळंदी – 06
चाकण – 06
वाकड – 30
हिंजवडी – 09
सांगवी – 09
चिखली – 27
देहुरोड – 00
तळेगाव दाभाडे – 04
तळेगाव एमआयडीसी – 03
रावेत चौकी – 04
म्हाळंगे चौकी – 03
शिरगाव चौकी – 05
एकुण – 199

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button