breaking-newsआंतरराष्टीय

अफगाणिस्तानात अमेरिकेची अवस्था शेपटी कापलेल्या लांडग्यासारखी – मसूद अझहर

एफएटीएफच्या बैठकीआधी पाकिस्तानने बेपत्ता घोषित केलेला कुख्यात दहशतवादी मसूद अझहर आता समोर आला आहे. अमेरिका-तालिबान करारावर त्याने ऑडिओच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. भारताला हवा असलेला हा मोस्ट वाँटेड दहशतवादी बेपत्ता असल्याचे पाकिस्तानने जाहीर केले होते.

जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख असलेल्या मसूद अझहरने अमेरिकेबरोबर झालेल्या शांती करारासाठी तालिबानच्या आधीच्या आणि विद्यमान नेतृत्वाला शुभेच्छा दिल्या आहेत. मसूदने जैशशी संबंधित असलेल्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून हा संदेश जारी केला आहे. शहीदांचे, मुजाहिद्दीन आणि गाझींचे अभिनंदन, हझरत शेख हक्कानीचे अभिनंदन असे मसूदने आपल्या संदेशात म्हटले आहे. संयुक्त राष्ट्राच्या दहशतवाद्यांच्या यादीत असलेल्या मसूद अझहरने अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या धोरणाची खिल्ली उडवली आहे.

“अफगाणिस्तानात अमेरिकेचा वावर लांडग्यासारखा होता. पण आज दोहा कतारमध्ये जिहादने एक उंची गाठली आहे, अपेक्षा खूप आहेत. लांडग्याची शेपटी कापली असून, दात उखडले गेले आहेत” असे मसूदने त्याच्या ऑडिओ संदेशात म्हटले आहे. मागच्या आठवडयात दोहामध्ये अमेरिका आणि तालिबानमध्ये शांती करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. करारानुसार शांतता कराराचे पालन केल्यास येत्या १४ महिन्यात अमेरिका अफगाणिस्तानातून सगळ्या सैनिकांना माघारी बोलवेल अशी घोषणा अमेरिकेने केली आहे. तालिबानने शांतता करार पाळला तर अमेरिका ८ हजार ६०० सैनिक परत बोलवेल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button