breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन
अपूर्वा नेमळेकरने गाजवला डान्सिंग क्वीनचा मंच
‘तुझं माझं जमतंय’ या आगामी मालिकेतून अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर पम्मी या व्यक्तिरेखेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तिच्या टेलिव्हिजनवरील पुनरागमनामुळे प्रेक्षक सुखावले आहेत आणि ही पम्मी नक्की काय चीझ आहे याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. पम्मीने नुकताच डान्सिंग क्वीनच्या मंचावर हजेरी लावलीअसून तिने डान्सिंग क्वीनचा मंच देखील गाजवला आहे. पम्मीचा ठसका प्रेक्षकांना या मंचावर पाहायला मिळाला.