breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

अपघातात 9 जणांचा मृत्यू, सुप्रिया सुळेंकडून कुटुंबीयांचे सांत्वन

पुणे –  पुणे-सोलापूर रोडवर शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात रायगडाहून परतणारे 9 तरुण जागीच ठार झाले. या तरुणांच्या कुटुंबीयांना बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट दिली. एक दोन नाही तर तब्बल नऊ माताचा हा हंबरडा ऐकूण खासदार सुप्रिया सुळे पूर्ण गहिवरून गेल्या होत्या. या मातांची समजूत घालायची तरी कशी अशी परिस्थिती खासदार सुप्रिया सुळेंपुढे निर्माण झाली होती.

पुणे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर लोणीकाळभोर गावानजीक कदम-वाक वस्ती येथे शनिवार भीषण अपघात झाला. दौंड तालुक्यातील यवत येथील अक्षय भारत वाईकर, विशाल सुभाष यादव, निखिल चंद्रकांत वाबळे, सोनू उर्फ नूर महमद आशपाक दाया, परवेज अशपाक आत्तार, अक्षय चंद्रकांत घिगे, दत्ता गणेश यादव, जुबेर अजित मुलाणी आणि कासुर्डी येथील शुभम रामदास भिसे अशा 9 जणांचा जागीच मृत्यू झाला. खासदार सुळे, पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष माजी आमदार रमेश थोरात आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांनी त्यांच्या कुटुंबीयांना भेट देऊन त्यांचे सांत्वन केले.

म्हातारपणीचा घास भरवणारा आणि आधार असलेला एकूलता एक मुलगा आमच्यातून अचानक निघून गेला. आता आम्ही कुणाकडे पाहून जगायचं. असा हंबरडा अक्षयच्या आईने फोडला. तर दत्ता यादव हा हांडेवाडीच्या जेएसपीएम महाविद्यालयातून अभियांत्रिकीची पदवीका नुकतीच उत्तीर्ण झाला होता. अभियांत्रिकी पदवी प्रवेश घेण्याची तयारी करत असणारा दोन महिने महाविद्यालयाला सुट्टी असल्याने अंगणवाडी सेविका असणाऱ्या आईला मदत व्हावी म्हणून खाजगी नोकरी करत होता. असा हा हुशार आणि गुणी मुलगा गेला म्हणत त्याने हंबरडा फोडला. या नऊ मातांचे हंबरडे ऐकूण उपस्थितांच्या काळजाचे पाणी पाणी झाले होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button