breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अत्याचारातील विकृतींना समाजानं विरोध करावा – विजया रहाटकर

पिंपरी (महा ई न्यूज) – समाजात अशा विकृती वाढत चालल्या आहेत. अशा विकृतींना समाजानं ठेचून काढत त्यांना विरोध करावा. अशा प्रवृत्ती तयार होणार नाहीत, याची दक्षता घेण्यासाठी येणा-या काळामध्ये काम करावं लागणार आहे. कासारसाई आणि पिंपरी येथील दोन्ही घटनांमधील नराधमांचा पोलीस शोध घेत आहेत, असे मत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी आज शुक्रवारी (दि. 28) पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

कासारसाईत घडलेल्या बलात्काराच्या घटनेतील मयत मुलगी आणि पीडित मुलीच्या कुटुबियांची विजया रहाटकर यांनी आज भेट घेतली. त्यांनी मुलींच्या कुटुबियांचे सांत्वन केले. नराधमांना कडक शिक्षा करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचा शब्द त्यांनी कुटुंबियांना दिला. त्यानंतर त्यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला भेट देऊन पोलिसांशी चर्चा केली. कासारवाई आणि पिंपरी येथील दोन्ही घटनांचा तपास जलदगतीने लावण्याच्या सूचना त्यांनी पोलिसांना दिल्या. यावेळी महापालिकेचे पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समितीच्या सभापती ममता गायकवाड, अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे, नगरसेवक शितल शिंदे, नामदेव ढाके, भाजप नेत्या उमा खापरे, शिक्षण समितीच्या सभापती सोनाली गव्हाणे, विधी समितीच्या माजी सभापती शारदा सोनवणे, महिला आघाडी शहराध्यक्षा शैला मोळक आदी यावेळी उपस्थित होते.

रहाटकर म्हणाल्या की, कासारवाई येथील घटना अत्यंत दुर्दैवी आहे. पीडित कुटुंबियांची भेट घेतली. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात जाऊन घटनेची सविस्तर माहिती घेतली. या घटनेचा तपास करण्यासाठी पोलिसांचे एक पथक बाहेरच्या राज्यात रवाना झाले आहे. राज्य महिला आयोग या घटनेत लक्ष घालून मुलींच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी तत्परता दाखवित आहे. केंद्र सरकारने  आयपीसी, सीआरपीसीमध्ये बदल केले आहेत. त्यामुळे बलात्कारातील गुन्हेगाराला यापुढे कठोर शिक्षा होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button