breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

अतिरेक्यांच्या स्लीपर सेलवरही संशय ; तपास एनआयएकडे देण्याची तयारी

नवी दिल्ली | दिल्ली दंगलीच्या तपासात संशयाची सुई अतिरेकी संघटनांच्या स्लीपर सेलच्या दिशेने वळत आहे. डोनाल्ड ट्रम्प ३६ तास भारतात असताना हिंसाचार वाढला. ते परतताच तो कमी झाला. हा योगायोग नाही, असे तपास संस्थांना वाटते. हिंसाचाराची वेळ व व्याप्ती दंगलीपुरती मर्यादित नाही. एका अधिकाऱ्यानुसार, हे मोठ्या आंतरराष्ट्रीय षड््यंत्राचे संकेत आहेत.

त्यामुळे तपास एनआयएकडे सोपवला जाईल. याला गृहमंत्रालयाने पुष्टी दिलेली नाही. एनआयए फक्त दहशतवादासंबंधीच्या प्रकरणाची चौकशी करते. सूत्रांनुसार, हिंसाचार झाला त्या भागात दहशतवाद्यांचे स्लीपर सेल होते. ट्रम्प यांच्या दौरा काळात ते सक्रिय झाले. गोळ्या लागून १३ मृत्यू होणे हा पण याच कटाचा भाग मानला जातो. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाची भूमिकाही तपासली जात आहे. दुसरीकडे, दिल्लीत परिस्थिती सुधारत असून शाळा मात्र ७ मार्चपर्यंत बंद राहतील.

पोलिस सध्या गुन्हे दाखल करत आहेत. १६३ गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांना ५५० वर तक्रारी मिळाल्या आहेत. आता आणखी प्रकरणे वाढतील. तपासासाठी एनआयएच्या तज्ज्ञांची गरज आहे.

हिंसेच्या आराेपींना कॅम्पसमध्ये बोलावू नका : जेएनयू प्रशासन

हिंसेच्या आरोपींना कॅम्पसमध्ये बोलावू नका, असे आदेश जेएनयूचे कुलगुरू जगदेश कुमार यांनी विद्यार्थ्यांना दिले. काही विद्यार्थ्यांनी अशा लोकांना कॅम्पसमध्ये राहण्याचे खुले आवाहन केले होते. जानेवारीत बाहेरील लोकांनी कॅम्पसमध्ये येऊन हिंसाचार केला होता, असा दावा करणारे हेच विद्यार्थी आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button