breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अजित पवार यांची संभाजी भिडे यांच्यावर टिका

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – विज्ञानाने प्रगती केली असताना आंबा खाल्ल्यानंतर मुलं होण्याचा शोध भाजपच्या काळात लावला जातो. एकिकडे मेक इनच्या नावाखाली तरूणांना नोकरीचे आमिष दाखवले जाते. तर, दुसरीकडे भाजपच्या काही जणांकडून बाष्पळ बडबड करूण अवमान केला जात आहे, अशी टिका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संभाजी भिडे यांचे नाव न घेता आज केली.

राष्ट्रवादीचे नाना काटे सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजित नोकरी मेळाव्याचे उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, नेते नाना काटे, पार्थ पवार आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले की, आधुनिक तंत्रज्ञानाचा विकास होत असताना मेक इनच्या नावाखाली सरकारने हजारो तरुणांना नोकरीचे आमिष दाखविले. एकही उद्योग राज्यात सुरु झाला नाही. नोकरी देने राहिले दूर उलट बेरोजगारी वाढली आहे. आज विज्ञान जगाला आव्हान देत असताना भाजपचे काही जण बुरसटलेल्या विचारांत अडकले आहेत. आंबा खावून मुलं होत असल्याचा साक्षात्कार त्यांना झाला आहे, हे न पटणारे आहे. अशी टीका पवार यांनी संभाजी भिडे यांचे नाव न घेता केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button