breaking-newsमुंबई

अखेर मनसेच्या शिशीर शिंदे यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई मनसेचे नेते शिशीर शिंदे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुंबईत आयोजित शिवसेनेच्या 52 व्या वर्धापनदिनाच्या सोहळ्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिशीर शिंदेनी पक्षप्रवेश केला. यावेळी त्यांनी छोटेखानी भाषण करुन आपल्या भावनाही व्यक्त केल्या. “उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवर भेटलो. निघताना त्यांच्या हाताला स्पर्श केला, तेव्हा बाळासाहेबांची आठवण झाली.”, असे शिशीर शिंदे म्हणाले.

हो मी चुकलो, शिवसैनिकांनो, मला माफ करा, बारा वर्षांपूर्वी शिवसेना सोडणं ही माझी चूक होती, असे म्हणत शिशीर शिंदे पुढे म्हणाले, यापुढे शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. उद्धव ठाकरे यांनी शिशीर शिंदेंच्या मनगटावर शिवबंधन बांधून, हातात भगवा झेंडा देऊन, त्यांना शिवसेनेत प्रवेश दिला.

शिशीर शिंदे हे मनसेचे विद्यमान सरचिटणीस आहेत. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे जे 13 आमदार निवडून आले होते, त्यामध्ये भांडुपमधून शिशीर शिंदे विजयी झाले होते. अत्यंत धाडाडीचे नेते आणि डॅशिंग आमदार म्हणून ते कायमच परिचित राहिले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button