Mahaenews

सातारा डीवायएसपींच्या गाडीला अपघात

Share On

कोरेगाव :  रहिमतपूर ते औंध मार्गावर पिंपरी फाट्यानजिक आज (दि. २९ एप्रिल)पहाटे साडे तीनच्या दरम्यान जिल्हा राञ गस्ती दरम्यान कोरेगाव उपविभागीय पोलिस अधिकारी प्रेरणा जीवन कट्टे यांच्या गाडीला  अपघात झाला. अपघातामध्ये त्यांच्या डोक्यास मार लागल्याने त्यांना सातारा येथील सातारा डायग्नोस्टीक रूग्‍णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताचे नेमके कारण समजले नाही. प्रेरणा कट्टे यांना प्रकृती स्वास्थ्यासाठी अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.

Exit mobile version