शिखर परिषदेसाठी डोनॉल्ड ट्रम्प यांचे सिंगापूरमध्ये आगमन

सिंगापूर – संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या शिखर परिषदेसाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांचे आज सिंगापूरमध्ये आगमन झाले. उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन सिंगापूरमध्ये आल्यानंतर काही तासातच ट्रम्प सिंगापूरला पोहचले.
कॅनडाहून 20 तासांचा प्रवास करून डोनॉल्ड ट्रम्प एयरफोर्स वनने ट्रम्प सिंगापूरच्या पाया लेबार विमानतळावर उतरले तेव्हा सिंगापूरचे परराष्टृ मंत्री व्हिव्हियन बालकृष्णन यांनी त्यांचे स्वागत केले. ट्रम्प यांनी त्यांचा नेहमीचा ट्रेडमार्क असलेला माओ सूट परिधान केला होता आणि त्यांनी नेहमीचीच खास अशी “हाय कट हेयर स्टाईल’ केली होती.
होणाऱ्या शिखर परिषदेबद्दल तुमचे काय विचार आहेत, असा प्रश्न विमानतळावर एका पत्रकाराने त्यांना विचारला. त्याला “फार चांगले विचार आहेत.’ असे उत्तर देऊन ट्रम्प आपल्या लिमोसिनमध्ये बसून निघून गेले.
अमेरिकेच्या प्रदीर्घ काळच्या कट्टृर शत्रू असलेल्या उत्तर कोरियचा हुकूमशहा किम जोंग उन आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांची शिखर परिषद होईल असे काही महिन्यांपूर्वी कोणाला स्वप्नातही वाटले नसेल. पण ते प्रत्यक्षात आले आहे. काही महिन्यांपूर्वी परस्परांचे सार्वजनिक “इन्सल्ट’ करणारे आणि परस्परांना धमक्या देऊन जगाला तिसऱ्या महायुद्धाकडे नेणारे हे दोन नेते मंगळवारी भेटंणार आहेत. उत्तर कोरियाच्या मध्यस्तीने ही गोष्ट शक्य झालेली आहे.
अमेरिकेला धोकादायक ठरू पाहणाऱ्या उत्तर कोरियाच्या अण्वस्त्रांच्या चाचण्या बंद करणे आणि ती नष्ट करणे ही अमेरिकेच्या पूर्वीच्या अध्यक्षांना न साधलेली गोष्ट ट्रम्प यांना साध्य करायची आहे. त्यात त्यांना किती यश मिळते हे येणार काळच ठरवणार आहे.