breaking-newsमनोरंजन

शाहरुख खानच्या बहुचर्चित ‘झिरो’चे पोस्टर्स प्रदर्शित

शाहरुख खानचा बहुचर्चित आगामी चित्रपट ‘झिरो’ चाहत्यांचा भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याआधी झिरोचे दोन पोस्टर्स शाहरुख खानने ट्विटर अकाऊंटवरून रिलीज केले आहेत. या दोन्ही पोस्टर्सला वेगवेगळ्या कॅप्शन देण्यात आल्या आहेत. या चित्रपटात शाहरुख खानसह अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

View image on Twitter

Shah Rukh Khan

@iamsrk

Isn’t she the warmest and kindest! My friend…Thanks for bringing Zero to life!

या पोस्टरमध्ये अनुष्का शर्मा व्हीलचेअरवर बसलेली दिसत असून शाहरुख खान अनुष्कासोबत मस्ती करताना दिसत आहे. या फोटोला कॅप्शन देताना शाहरुखने लिहले कि, ‘पूर्ण जगात माझ्या बरोबरीची एकच तर आहे.’ या चित्रपटात अनुष्का दिव्यांगांची भूमिकेत झळकणार आहे.

View image on Twitter

Shah Rukh Khan

@iamsrk

Sitaaron ke khwaab dekhne walon, humne toh chaand ko kareeb se dekha hai. @aanandlrai @RedChilliesEnt @cypplOfficial

तर ‘सितारों के ख्वाब देखने वालों, हमने तो चांद को करीबसे देखा है’ असे लिहीत शाहरुखने कतरिना कैफसोबतचे दुसरे पोस्टर शेअर केले आहे.

आनंद एल. राय दिग्दर्शित ‘झिरो’ चित्रपट २१ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. तत्पूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर शाहरुख खानच्या वाढदिवसाचे औचित्य साधत २ नोव्हेंबरला प्रदर्शित करण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button