विविध मागण्यांसाठी रिक्षा, टॅक्सी, एसटी बस संघटनांचे आंदोलन

- नागपूर येथे पदाधिका-यांच्या बैठकीत निर्णय
- विदर्भातील ११ जिल्हे सहभागी होणार
- २६ जून रोजी होणार आंदोलन
पिंपरी – रिक्षा, टॅक्सी, एसटी बस या सर्व संघटनांच्या वतीने विविध मागण्यांसाठी २७ जून रोजी आंदोलन करण्यात येणार आहे, या आंदोलनात विदर्भातील सर्व रिक्षा संघटना सहभागी होणार असल्याची माहिती अॅटो रिक्षा संघटना संयुक्त कृती समितीचे सरचिटणीस बाबा कांबळे यांनी दिली.
विदर्भ अॅटो रिक्षा फेडरेशनच्या वतीने नागपूर येथील बिटीन सभागृहात विदर्भातील रिक्षा संघटना अध्यक्ष प्रतिनिधीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. विदर्भ अॅटो रिक्षा फेडरेशनचे अध्यक्ष विलास भालेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत अॅटो रिक्षा संघटना संयुक्त कृती समितीचे महाराष्ट्र सरचिटणीस बाबा कांबळे (पुणे पिंपरी चिंचवड), राजेंद्र सोनी (दिल्ली), नरेंद गायकवाड (नांदेड), मधुकर थोरात (पनवेल रायगड), मारुती कोंडे (नवी मुंबई), महिपती पवार (सोलापूर), आनंद चौरे, रवी तेलरंदे, जावेद शेख (नागपूर), देवबाबू निखडे (वर्धा), मोशस्वर लोकरे (चंदरपूर )आदी उपस्थित होते.
बाबा कांबळे म्हणले की, मुंबई येथे झालेल्या रिक्षा टॅक्सी एसटी बस संघटनेच्या मेळाव्यात २६ जून रोजी राज्य व्यापी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनात महाराष्ट्रातील वीस लाख रिक्षा चालक मालक सहभागी होणार आहेत. यासाठी महाराष्ट्रात विभागवार बैठका सुरू आहेत. विदर्भातील ७५ हजार रिक्षा चालकांचे नेतूत्व करणारे विदर्भ अॅटो रिक्षा फेडरेशन आंदोलनात सहभागी झाल्यामुळे आंदोलनाची व्याप्ती वाडली आहे.
केंद्र सरकारने मंजूर केलेले नवीन मोटार विधायक रद्ध करावे. रिक्षा चालक मालकांसाठी जाहीर केलेल्या कल्याणकारी महामंडळाची अंमलबजावणी करावी. बेकायदेशिर वाहतूक बंद करावी. ओला, उबेर या भांडवलदार कंपन्यांवर निर्बंध आणावेत, रिक्षा विमाचे वाडलेले दर कमी करावेत, यासह इतर विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे विलास भालेकर यांनी सांगितले.