breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
महिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे : जया बच्चन

नवी दिल्ली : तुम्ही गायींना वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहात, पण महिलांवर होत असलेले अत्याचार कमी होताना दिसत नाही. त्यामुळे यावर युद्धपातळीवर प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी व्यक्त केले.
राज्यसभेत महिलांविषयी उपस्थित प्रश्नावर बोलताना जया बच्चन यांनी मत मांडले. गेल्या काही दिवसांपासून गो हत्या कायद्यावरुन देशांत मतभेद दिसून येत आहे. याचबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संपूर्ण देशात गो हत्या कायदा करण्याची मागणी केली. तर दुसरीकडे संरक्षण करणाऱया गोरक्षकांकडून होत असलेल्या हिंसाचारावर मोठी टीका होताना दिसत आहे. या प्रश्नावर मत व्यक्त करताना केंद्र सरकारला त्यांनी ठणकावले.