breaking-newsमनोरंजनमुंबई

मराठी चित्रपटांच्या प्रमोशनसाठी सरकार प्रयत्न करणार: तावडे

मुंबई – दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य योजनअंतर्गत आज मराठी चित्रपट निर्मात्यांना अनुदान प्रदान करण्यात आले. यावेळी विविध चित्रपट संस्थेचे निर्माता आणि दिग्दर्शक उपस्थित होते. चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य करतानाच यापुढे मराठी चित्रपटांच्या प्रमोशनसाठी अर्थसहाय्य करण्याबाबत विचार करता येईल का, याबाबतचे मत आणि भूमिका सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी जाणून घेतली. त्याचप्रमाणे मराठी चित्रपट जास्तीत जास्त रसिकांपर्यंत पोहचविण्यासाठी आणि चित्रपटांची पायरसी थांबविण्याच्या दृष्टीने काही कायदेशीर पावले उचलण्याबाबत राज्य सरकार सहकार्य करेल, असेही  तावडे यांनी सांगितले. मराठी चित्रपट खेड्यापाड्यात आणि प्रत्येक प्रेक्षकांपर्यत पोहचविण्याच्या दृष्टीने चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी त्या चित्रपटाचे सोशल मिडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रसार करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक विचार करेल असेही, तावडे यांनी सांगितले.

राज्य सरकार म्हणून मराठी चित्रपट सृष्टीच्या पाठी खंबीरपणे उभे राहण्याचे आश्वासन देतानाच चित्रपट निर्माता, दिग्दर्शकांनी सरकारकडून आपल्या नेमक्या काय अपेक्षा आहेत व चित्रपट अधिक रसिकांपर्यंत पोहचविण्याच्या दृष्टीने त्यांचे विचार श्री. तावडे यांनी चित्रपट निर्माता व दिग्दर्शक यांच्या समवेत झालेल्या बैठकीत ऐकून घेतले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button