breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

‘बेटी बचाव’ घोषणेचं काय झालं?- सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा

नवी दिल्ली: चंदिगडमध्ये आयएस अधिकाऱ्याच्या मुलीची भाजप नेत्याच्या मुलाने छेड काढल्याचं प्रकरण भाजपच्या चांगलच अंगाशी आलं आहे. याप्रकरणात आता काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा यांनी उडी घेतली असून ‘बेटी बचाव घोषणेचं काय झालं?’ असा सवालच त्यांनी भाजपला केला आहे.
रॉबर्ट वाड्रा यांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकून हा सवाल केला आहे. ‘एखाद्या महिलेची छेड काढण्याची घटना घडते आणि तरीही आरोपीला केवळ तो भाजपच्या हरयाणा प्रदेश अध्यक्षांचा मुलगा आहे म्हणून अभय दिल्या जाते हे फार गंभीर आणि धक्कादायक आहे. आता ‘बेटी बचाव’ घोषणेचं काय झालं?’, असा सवाल वड्रा यांनी या फेसबूक पोस्टमधून केला आहे.
‘या महिलेबाबत सोशल मीडियावर ज्या पद्धतीने लिहिलं जायतंय ते लज्जास्पद आहे. मुख्यमंत्र्यांनी केलंलं विधानही मानखाली घालायला लावणारं आहे. हे काही व्यक्तिगत प्रकरण नाही. त्यामुळे अशा घटनांवर व्यक्तिगत खुलासा करता कामा नये’, असंही वड्रा यांनी म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button