ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
रुपीनगर- तळवडेमध्ये होणार हरी नामाचा गजर!
– संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज जीवन चरित्र कथा कार्यक्रमाचे आयोजन
पिंपरी | प्रतिनिधी
रुपीनगर- तळवडे येथील शरद वसंत भालेकर स्पोर्ट्स फाऊंडेशन, यांच्यातर्फे संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज जीवन चरित्र कथा सादरीकरण कार्यक्रम आयोजितकरण्यात आला आहे.हा कार्यक्रम सोनिगरा मैदान, राजमाता जिजाऊ हौसिंग सोसायटीजवळ, रुपीनगर- तळवडे येथे आयोजित करण्यात आला आहे. ह.भ.प.धर्माचार्य अॅड. शंकर महाराज शेवाळे चरित्र कथा सादर करणार आहेत.कार्यक्रम १७ ते १९ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी १ तसेच सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत होईल. सप्तश्रृंगी प्रतिष्ठान, माथाडी कामगार एकता मित्र मंडळ, हिंदवी सखी मंच आणि हिंदवी स्पोर्ट्स क्लब यांच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती मुख्य संयोजकांनी दिली.