breaking-newsआंतरराष्टीय
फक्त दहा दिवसात बेकार होणार तुमचे आधार कार्ड

नवी दिल्ली : युनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडिया अर्थात युआयडीएआयने आधारमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यूआयडीएआयने व्हर्चुअल आयडीची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. आता अनेक सुविधांचा लाभ घेण्यासाठी आधार नंबर देण्याची गरज नाही. आता सरकार आधार व्हर्चुअल आयडीच्या वापरावर अधिक जोर देणार आहे. यासाठी केवळ १० दिवसांचा अवधी बाकी आहे. कारण तुमचे आधार व्हर्चुअल आयडीच्या जागेवर काम करणार आबहे.
व्हर्चुअल आयडीमुळे आधार ऑथेंटिकेशन आधीपेक्षा अधिक सुरक्षित होणार आहे. व्हर्चुअल आयडी एक १६ अंकी क्रमांक असेल, जो ऑथेंटिकेशनच्या वेळी आधार क्रमांकाऐवजी वापरण्यात येईल. हा क्रमांक आवश्यक असेल तेव्हा संगणकीय पद्धतीने तत्काळ जनरेट करता येईल. सर्व संस्था १ जून २०१८ पासून ही नवी पद्धत अंमलात आणणार आहेत. आधार व्हर्चुअल आयडीला UIDAIच्या पोर्टलवरुन जनरेट करता येतो. हा एक डिजीटल आयडी असेल. आधार होल्डर याला अनेकवेळा जनरेट करता येतो. सध्याच्या घडीला व्हीआयडी केवळ एका दिवसासाठी व्हॅलिड असतो.
व्हीआयडी जनरेट करण्यासाठी यूआयडी च्या होमपेजवर जा. आता आपला आधार नंबर टाका. यानंतर सिक्युरिटी कोड टाका आणि सेंड ओटीपी क्लिक करा. ज्या मोबाईल नंबरवर आधार रजिस्टर्ड होईल. त्यावरच तुम्हाला ओटीपी पाठवला जाईल. ओटीपी टाकल्यानंतर नवा व्हीआयडी जनरेट करण्याचा पर्याय मिळेल. जेव्हा हा जनरेट होईल तेव्हा तुमच्या मोबाईल तुमचा व्हर्चुअल आयडी पाठवला जाईल. हा १६ अंकी असेल. व्हर्चुअल आयडीने नाव, पत्ता आणि फोटो ग्राफसारख्या अनेक गोष्टींचे व्हेरिफिकेशन होऊ शकणार आहे. कोणताही युजर हवे तेवढे व्हर्चुअल आयडी जनरेट करु शकतो. जुना आयडी आपोआप कॅन्सल होईल.