पावसाळ्यात २८ वेळा मोठी भरती

मुंबई : पावसाळ्यातील मोठय़ा भरतीच्या वेळा महापालिकेने जाहीर केल्या असून येत्या पावसाळ्यात मुंबईच्या समुद्रात तब्बल २८ वेळा मोठी भरती येणार आहे. या काळात समुद्रात साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळणार आहेत, तर १२ वेळा भांगाची भरती (लघुत्तम भरती-ओहोटी-नीप टाइड) येणार आहे. मोठय़ा भरतीच्या काळात अतिवृष्टी झाल्यास मुंबईकरांना सावध राहावे लागणार आहे. जूनमध्ये तीन वेळा नीप टाइड येणार आहे.
जून ते सप्टेंबर या काळात १ सप्टेंबरला सर्वाधिक उंचीच्या लाटा येणार आहेत. या दिवशी दुपारी १.१५ वाजता ४.९१ मीटर उंचीच्या लाटा उसळतील. पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो, तेव्हा साडेचार मीटर उंचीच्या लाटा उसळल्या आणि त्याच वेळी अतिवृष्टी झाली, तर पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे सखल भागात पाणी साचते.
जून महिन्यातील वेळापत्रक
दिनांक वेळ उंची (मी.)
३ जून दु. १२.१२ ४.५३
४ जून दु. १२.५३ ४.६४
५ जून दु. १.३६ ४.६८
६ जून दु. २.२० ४.६५
७ जून दु. ३.०७ ४.५५
१७ जून दु. १२.१८ ४.५१