breaking-newsराष्ट्रिय

पश्‍चिम बंगालमध्ये आणखी एका भाजप कार्यकर्त्याचा संशयास्पद मृत्यू

कोलकाता – पश्‍चिम बंगालमधील पुरुलिया जिल्ह्यातील बलरामपूर येथे आज आणखी एका भाजप कार्यकर्त्यांचा मृतदेह विजेच्या खांब्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. या आठवड्यातील ही दुसरी घटना असून तीन दिवसांपूर्वींच अशाच प्रकारे एकाचा मृतदेह सापडला होता. या दोन्ही दुर्घटनांमागे तृणमूल कॉंग्रेसचा हात असून याचा तपास सीबीआयद्वारे करण्यात यावा, अशी मागणी भाजपने केली आहे.

दुलाल कुमार मृत्यू झालेल्या भाजप कार्यकर्त्याचे नाव असून त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदनाच्या अहवालनानंतरच मृत्यूचे निश्‍चित कारण समजू शकेल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. त्यानंतर भाजपचे राष्ट्रीय चिटणीस राहुल सिन्हा यांनी या प्रकरणी तृणमूल कॉंग्रेस पक्षाला लक्ष्य केले असून या प्रकरणांची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

दरम्यान, मंगळवारी भाजपच्या त्रिलोचन माहातो हा 18 वर्षीय दलित कार्यकर्ता बलरामपूर परिसरातील सुपुर्डी गावात एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. आज अशाच प्रकारची ही दुसरी घटना घडली आहे. तृणमूल कॉंग्रेसचे पुरुलिया परिसरातील प्राबल्य कमी होऊ लागले आहे. त्यामुळे त्यांनी माओवाद्यांशी हातमिळवणी केली असून ते भाजप कार्यकर्त्यांना ठार करत आहेत, असा आरोप सिन्हा यांनी केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button