टपरीचालकांना मारहाण, दमदाटी करून हप्त्याची मागणी

- टपरीचालकांना मारहाण, दमदाटी करून हप्त्याची मागणी
पुणे – टपरीचालकांना मारहाण व दमदाटी करून हप्ता वसूल करण्याचा प्रकार येरवडा येथील आंबेडकर चौकात घडला. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी एका पान टपरी चालकाने फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे पान टपरीवर हजर असताना आरोपींनी तेथे येऊन सिगारेट घेतली. यानंतर सिगारेटचे पैसे दिले नाहीत. फिर्यादीने पैसे मागताच त्याला शिवीगाळ करून डोक्यात दगड घालून जखमी करण्यात आले. तसेच फिर्यादी यांना “तु आम्हाला ओळखत नाहीस का, या एरियाचे आम्ही भाई आहोत. सर्व लोक आम्हला हप्ता देतात, तु सुध्दा आम्हाला हप्ता दे नाहीतर तुला घोडा लावतो’ असता दम भरला. यानंतर जबरदस्तीने त्याच्याकडून एक हजार रुपये वसूल करून टपरीचे नुकसान केले. तसेच शेजारील भेळवाल्याला मारहाण करून त्याच्याही टपरीचे नुकसान केले. भेळवाल्याकडून जाताना हप्ता म्हणून 300 रुपये घेतले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अनिल लोहार तपास करत आहेत.