breaking-newsआंतरराष्टीय

जकार्ताहून १८८ प्रवासी घेऊन निघालेले विमान समुद्रात कोसळले, अवशेष सापडले

इंडोनेशियाचे लायन एअरवेजचे विमान सोमवारी जकार्ताहून उड्डाण केल्यानंतर काही मिनिटातच समुद्रात कोसळले आहे. विमान जेटी- ६१० जकार्ताहून पान्गकल पिनांगला जात होते. राष्ट्रीय शोध आणि बचाव संस्थेचे प्रवक्ते युसूफ लतीफ यांनी विमान कोसळल्याच्या वृत्तास दुजोरा दिला आहे. लायन एअर बोईंग ७३७ प्रवासी विमानात कर्मचाऱ्यांसह १८८ प्रवासी होते. विमानातील सर्वचजण दगावले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, विमानाचे अवशेष आढळून आले आहेत.

ANI

@ANI

Indonesia energy firm Pertamina official says debris, including plane seats, found near its offshore facility in Java sea. Indonesia transport ministry official says crashed Lion Air flight was carrying 188 people, including crew, reports Reuters

माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार विमानाने जकार्ता विमानतळावरुन उड्डाण केले होते. विमान सुमात्रातील पान्गकल पिनांगला जात होते. उड्डाणाच्या १३ मिनिटानंतर विमानाचा संपर्क तुटला. संपर्क तुटण्यापूर्वी पायलटने विमान परतीचे संकेत दिले होते, असे सांगितले जात आहे. शोध मोहिमेदरम्यान जावा समुद्रकिनारी विमानाचे अवशेष आढळून आले आहेत.

Sutopo Purwo Nugroho

@Sutopo_PN

Serpihan pesawat Lion Air JT 610 yang jatuh di perairan Karawang. Beberapa kapal tug boad membantu menangani evakuasi. Video diambil petugas tug boad yang ada di perairan Karawang.

ANI

@ANI

Lion Air flight from Jakarta to Pangkal Pinang which lost contact with air traffic controllers at 6.33 am has crashed, reports Reuters quoting Indonesia search and rescue official

विमानात एकूण १८८ प्रवासी होते. यामध्ये १७८ प्रौढ, १ बालक, २ नवजात, २ पायलट आणि ५ फ्लाइट अटेंडंट यांचा समावेश होता. प्रवाशांबाबत अद्याप काही माहिती समजू शकलेली नाही. शोध मोहीम सुरु आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी ६ वाजून ३३ मिनिटांनी विमानाने उड्डाण केले होते. विमानाचा शोध घेण्यासाठी शोध व मदत अभियान सुरु करण्यात आले. परंतु, काही वेळातच विमान कोसळल्याचे वृत्त आले.

इंडोनेशियातील पेर्टीमिना ऊर्जा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानाचे अवशेष जावा समुद्रात दिसून येत आहेत. तर इंडोनेशियाच्या परिवहन मंत्रालयाने कोसळलेल्या विमानात क्रू मेंबरसह १८८ प्रवासी होते, असे सांगितले आहे. सोमवारी सकाळी ६.३३ मिनिटांनी विमानाचा संपर्क तुटला. त्यानंतर प्रशासनाने डोंगर परिसरात शोध मोहीम सुरु केल्याचे वृत्त ‘द स्ट्रेट्स टाइम्स’ने दिले होते.

ANI

@ANI

The Indonesian authorities have mounted a search and rescue operation for the missing Lion Air plane, which lost contact with air traffic controllers at 6.33 am today: The Straits Times

ANI

@ANI

Lion Air flight from Jakarta to Pangkal Pinang goes missing 13 minutes after take-off, reports Singapore’s Strait Times

View image on Twitter

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button