breaking-newsराष्ट्रिय

भारत मोठ्या बदलांना सामोरा जातो आहे-पंतप्रधान नरेंद्र मोदी

भारत सध्या अनेक मोठ्या बदलांना सामोरा जातो आहे. सध्या गुंतवणूक करायची असेल तर भारत हा एक उत्तम देश आहे. जपानमध्ये राहणाऱ्या भारतीय माणसांनी प्रगती करावी आणि भारताच्या प्रगतीलाही हातभार लावावा. वैश्विक शांततेत भारताची भूमिका महत्त्वाची आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जपान दौऱ्यावर आहेत. सध्या ते जपान मध्ये राहणाऱ्या भारतीय लोकांच्या समुहाशी संवाद साधत आहेत.

ANI

@ANI

Today India is making tremendous progress in field of digital infrastructure. Broadband connectivity is reaching villages, over 100 Cr mobile phones are active in India,1 GB is cheaper than a small bottle of cold drink. This data is becoming the tool for service delivery: PM Modi

सध्याच्या घडीला भारत ही वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असलेला देश आहे. बुलेट ट्रेन-स्मार्ट सिटी, न्यू इंडिया ही भारताच्या विकासाची पावलं आहेत. न्यू इंडिया अर्थात नवभारत घडवायचा असेल तर मला तुम्हा सगळ्यांचं सहकार्य हवं आहे असंही आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपान येथील बांधवांना केलं. एवढंच नाही तर जगातली सर्वात मोठी शिल्पकृती अर्थात स्टॅच्यू ऑफ युनिटी हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा पाहण्यासाठी तुम्ही जरूर भारतात या असेही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले. सरदार वल्लभभाई पटेल यांची प्रतिभा जेवढी महान होती तेवढेच महान शिल्प आम्ही साकारले आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

गेल्या वर्षी भारतीय वैज्ञानिकांनी १०० सॅटेलाइट अंतराळात सोडले. आपण चांद्रयान आणि मंगळयानही इतर देशांच्या तुलनेत कमीत कमी खर्चात पाठवलं आहे. भारतीय वैज्ञानिक आता गगनयान अंतराळात पाठवण्याची तयारी करत आहेत. मेक इन इंडिया हा एक वैश्विक ब्रांड म्हणून उदयास येतो आहे. भारत दर्जेदार उत्पादनं तयार करतो आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटोमोबाइल उत्पादनांच्या बाबतीत भारत आघाडीवर आहे असेही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button