breaking-newsमहाराष्ट्र
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

नांदेड – पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा खून केल्याची घटना नायगाव तालुक्यातील राहेर येथे शनिवारी घडली. याप्रकरणी कुंटूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.धर्माबाद तालुक्यातील शंकरगंज येथील सपना हिचा विवाह नायगाव तालुक्यातील राहेर येथील पुंडलिक पिल्लेवाड याच्यासमवेत झाला होता. विवाह झाल्यापासून पुंडलिक हा पत्नी सपना हिच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेत होता. ३ नोव्हेंबर रोजी सपना ही घरी असताना चारित्र्याच्या संशयावरून दोघांत वाद झाला व पुंडलिकने राहत्या घरी सायंकाळच्या सुमारास तिचा गळा आवळून खून केला. याप्रकरणी रेखा नागरवाड यांच्या तक्रारीवरून कुंटूर पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल केला आहे.