खासदार श्रीरंग बारणेंना मतदारांनी फोडला घाम ; शिवसेनेची सत्ता असूनही पाणी प्रश्न जैसे थे

- पाणी प्रश्नावर गावकरी आक्रमक, एकदा निवडून आल्यानंतर फिरकतच नसल्याची भावना
- शिवसेनेची सत्ता असतानाही मावळ, कर्जत, उरण परिसरात पिण्याच्या पाण्याची बोंबाबोंब
पिंपरी ( महा ई न्यूज ) – केंद्रात- राज्यात भाजप-शिवसेनेची सत्ता आहे. तर मावळ लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेचा मागील दहा वर्षापासून खासदार निवडून दिला जात आहे. तरीही मावळ, कर्जत, उरण आणि मावळ परिसरातील विविध खेड्या-पाड्यात पिण्याची पाण्याची सर्वत्र बोंबाबोंब आहे. अनेकदा आमदार आणि खासदार निवडून आल्यानंतर परत पाच वर्षे मतदारसंघातील गावामध्ये फिरकतच नाहीत. त्यामुळे मावळात प्रचारनिमित्त खासदार श्रीरंग बारणे गावागावात फिरत असताना त्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. कित्येक गावात पिण्याची पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून त्या प्रश्नाकडे शिवसेनेने वर्षानुवर्षे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे प्रचाराला आल्यानंतर गावकरी खासदारांना समस्यांबाबत जाब विचारु लागली आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघात रायगड जिल्ह्यातील उरण, कर्जत आणि पनवेल तर पुणे जिल्ह्यातील पिंपरी, चिंचवड व मावळ या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. मावळ लोकसभेवर मागील दहा वर्षापासून शिवसेनेची सत्ता आहे. तर कर्जत वगळता सर्वत्र भाजप-शिवसेनेचे आमदार निवडून आलेले आहेत. त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना खासदार श्रीरंग बारणे हे प्रचारानिमित्त गावोगावी फिरत असताना तेथील अनेक गावचे स्थानिक ग्रामस्थ खासदारांनी पाच वर्षांत गावच्या समस्या न सोडविल्यामुळे जाब विचारु लागली आहेत.
शिवसेनेचे खासदार बारणे हे एकदा निवडणूक झाली, परत मतदारसंघातील लोकांकडे फिरत नाहीत. गावातील पायाभूत सोयी-सुविधा सोडविण्यात ते असमर्थ ठरत आहेत. अनेक गावात नागरिकांना पिण्याचे पाण्याची समस्या भेडसावत आहे, गावाकडे जाणारे मुख्य रस्ते व अंर्तगत रस्त्याची अवस्था दैयंनिय झाली आहे. मावळातील विविध कंपन्यामध्ये परप्रातियांचा लोंढा वाढल्याने स्थानिक लोकांच्या बेरोजगारी प्रश्न निर्माण झाली आहे. त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे प्रचारानिमित्त फिरताना त्यांना मतदारांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.