breaking-newsताज्या घडामोडीपुणे
खडकीत धक्कादायक प्रकार; ड्रग्ज रिऍक्शननंतर तरुणाचा मृत्यू

पुणे – इंजेक्शन दिल्यानंतर झालेल्या ड्रग्ज रिऍक्शननंतर एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना खडकी कॅन्टोमेंट रुग्णालयात घडली. या प्रकरणी रुग्णालयातील एका महिला डॉक्टरविरुध्द खडकी रुग्णालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आशिष राहुल अल्हाट(25,रा.रेंजहिल्स, खडकी) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याला 5 ऑक्टोबर 2018 रोजी खडकी कॅन्टोमेंट रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे एका महिला डॉक्टरने त्याला इंजेक्शन दिल्यावर ड्रग्ज रिऍक्शन झाली. मात्र यावर तातडीने कोणतीही उपाययोजना किंवा औषधोपचार करण्यात आले नाहीत. यामुळे आशिषचा मृत्यू झाला. आशिष याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी संबंधीत महिला डॉक्टरविरुध्द खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक कांबळे करत आहेत.