Views:
444
मुंबई: बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये प्रत्येक सण आणि उत्सव मोठ्या आनंदाने साजरे केले जातात. केवळ दिवाळी, दसराच नव्हे तर रक्षाबंधनच्या दिवशीही सेलिब्रिटींमध्ये जल्लोषाचे वातावरण असते. उद्या साजºया होणाºया रक्षाबंधन या सणाचे सध्या बॉलिवूडमध्ये उत्साहाचे वातावरण असून, आपल्या भाऊरायाला ओवळण्यासाठी बहिणींकडून जय्यत तयारी केली जात आहे. अभिनेत्री कॅटरिना कैफनेही रक्षाबंधनासाठी खास तयारी केली आहे. वास्तविक कॅटरिनाचा परिवार भारतात नाही, शिवाय तिला भाऊ नाही. अशात तुम्ही म्हणाल की, कॅट कोणाला राखी बांधेल? तर याचा आज आम्ही उलगडा करणार असून, दरवर्षी कॅट नित्यनेमाने अभिनेता अर्जुन कपूर याला राखी बांधत असते.
कॅटरिना अर्जुनला भाऊ मानत असल्याने त्याला दरवर्षी न चुकता राखी बांधत असते. त्यासाठी तिच्याकडून तयारीदेखील केली जाते. अर्जुनदेखील आपल्या लाडक्या बहिणीकडून राखी बांधून घेण्यास उत्सुक असतो. शिवाय तो तिला गिफ्टही देत असतो. सध्या हे दोघेही मुंबईतच असल्याने, उद्याचा सण जल्लोषात साजरा केला जाईल, यात शंका नाही. काही दिवसांपूर्वीच कॅटरिना तिच्या आगामी ‘टायगर जिंदा हैं’ या चित्रपटाची शूटिंग करून मोराक्को येथून मुंबईत परतली आहे. तर अर्जुनचा ‘मुबारका’ हा चित्रपट रिलीज झाला असून, प्रेक्षकांचा त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे.
Like this:
Like Loading...