इंधन दरवाढ नियंत्रणासाठी साम-दाम-दंड-भेदचा वापर करा-आदित्य ठाकरे

मुंबई : पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीवरून शिवसेना आणि भाजपा यांच्यात सुरू असलेले द्वंद्व अधिक तीव्र झाल्याचे पाहायला मिळत आहे. शाब्दिक युद्धात आता युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनीही उडी घेतली आहे. इंधन दरवाढीवरुन आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ”पेट्रोल-डिझेलचे दर नियंत्रणात आणण्यासाठी साम-दाम-दंड-भेदचा वापर करा”, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला हाणला आहे. ट्विटरवरुन आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना पालघरची निवडणूक जिंकण्यासाठी साम, दाम, दंड, भेदाचा वापर करण्याची सूचना दिल्या होत्या. यासंबंधीची एक ऑडिओ क्लिप शिवसेनेने एका जाहीर सभेमध्ये समोर आणली होती. यावरुन आता उद्धव ठाकरेंनंतर आदित्य ठाकरे यांनीही मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.