Uncategorized

अहमदाबादेत अहमदाबादेत CM किंवा शहांना भेटलो नाहीः राणे

मुंबई:  भाजपनं मला आधीच ऑफर दिली आहे. ते सारखं विचारतात. पण मी त्यांना ‘हो’ही म्हटलेलं नाही आणि ‘नाही’ही म्हटलेलं नाही. तसंच, काल मी अहमदाबादेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांना भेटल्याचं वृत्तही चुकीचं आहे, मी कुणालाही भेटलेलो नाही, असं स्पष्ट करत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी भाजपप्रवेशाच्या चर्चा फेटाळून लावल्या.
गेल्या दीड-दोन महिन्यात मी दोन वेळा मुख्यमंत्र्यांसोबत विमानाने आणि गाडीतून प्रवास केला आहे. टीव्हीवर दाखवली जाणारी, आम्ही एकत्र प्रवास केल्याची दृश्यं कधीची आहेत, मला माहीत नाही. पण, मी अहमदाबादला खासगी कामासाठी गेलो होते, तिथे मी हयात हॉटेलमध्ये उतरलो होतो, हॉटेलच्याच मर्सिडीज कारमधून मी प्रवास केला, त्यामुळे मुख्यमंत्र्यांसोबत प्रवास करण्याचा प्रश्नच नाही, असा खुलासाही राणेंनी केला.
मात्र त्याचवेळी, माझा काहीही निर्णय असेल, तरी तो आत्ता सांगणार नाही, असं जाता-जाता सांगून राणेंनी पक्षांतरासंदर्भातील संदिग्धता कायम कायम ठेवली आहे. मी भाजपमध्ये जाणार नाही, शिवसेनेत जाणार नाही, राष्ट्रवादीत जाणार नाही, असं राजकारणात सांगता येत नाही, असंही त्यांनी सूचित केलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button