breaking-newsक्रिडा

115 वी आगाखान हॉकी स्पर्धा: एसआरपीएफ पुणे, पुणे शहर पोलीस संघांचे विजय

पुणे- एसआरपीएफ पुणे, पुणे शहर पोलीस संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करताना येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र हॉकी असोसिएशनच्या वतीने आयोजित 115व्या अखिल भारतीय आगाखान करंडक हॉकी स्पर्धेत विजयी आगेकूच केली. सदर स्पर्धा पिंपरी चिंचवड येथील मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये सुरू आहे.

सोमवारी झालेल्या पहिल्या लढतीत एसआरपीएफ संघाने सोलापूर संघावर 7-0ने मात केली. ही लढत एकतर्फीच झाली. संपूर्ण लढतीत एसआरपीएफ संघाच्या खेळाडूंनी सोलापूरच्या खेळाडूंना संधीच दिली नाही. यात लढतीच्या तिसऱ्याच मिनिटाला आशिष चोपडेने निलेश जॉयच्या पासवर गोल करून एसआरपीएफ संघाचे खाते उघडले. तीन मिनिटानंतर निलेश जॉयने ( 6 मि.) मैदानी गोल केला. पुढच्याच मिनिटाला संतोष मोरेने (7 मि.) सचिन जाधवच्या पासवर गोल करून एसआरपीएफ संघाला 3-0 ने आघाडी मिळवून दिली. यानंतर शीतल पवारने (12, 27 मि.) दोन गोल केले, तर निलेश चोपडे (23 मि.) आणि सचिन जाधव (25 मि.) यांनी प्रत्येकी एक गोल केला. निलेश चोपडेने राकेश सहारेच्या पासवर, तर सचिन जाधवने मोहनिश पठाणच्या पासवर गोल केले.

दुसऱ्या लढतीत ए. राजपूतच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर पुणे शहर पोलीस संघाने रत्नागिरी संघावर 5-1ने मात केली. यात राजपूतने 8 व्या, 27व्या आणि 28व्या मिनिटाला गोल केले. विशाल बारामतीकर (13 मि.) आणि इंदल सूर्यवंशी (29 मि.) यांनी प्रत्येकी एक गोल केला. रत्नागिरी संघाकडून एकमेव गोल केतन मंडोरेने (16 मि.) केला.
तिसजया लढतीत नागपूर अकॅडमीने इंदोर संघावर 4-1ने मात केली. यात लढतीच्या 17व्या मिनिटाला रोहित खनवालने मैदानी गोल करून नागपूर संघाला आघाडी मिळवून दिली. यानंतर 27व्या मिनिटाला फरहान शेखच्या पासवर नदीम शेखने गोल करून नागपूरला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. मध्यन्तराला नागपूर संघाने ही आघाडी कायम राखली होती. उत्तरार्धात लोकेश शर्माने (42 मि.) गोल करून इंदोरची पिछाडी कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र यानंतर रोहित खनवाल (43मि.) आणि नदीम शेख (47मि.) यांनी गोल करून नागपूर संघाला 4-1 असा विजय मिळवून दिला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button