breaking-newsपिंपरी / चिंचवड

सांगवीत चेंबरमधुन सांडपाणी येतेय रस्त्यावर

पिंपरी –  सांगवी येथील मधुबन सोसायटी प्रमुख रस्त्यावरील सांडपाणी चेंबर तुंबण्याच्या प्रकारामुळे चेंबरमधुन रस्त्यावर पाणी येणे नित्याचे झाले आहे. मधुबनचा हा एकमेव प्रमुख रस्ता असल्याने संपुर्ण मधुबन रहिवासी या रस्त्याचा वापर करतात. जवळच गणपती मंदिर आहे. रस्त्यावर येणाऱ्या सांडपाण्यातुनच नागरीकांना रहदारी करावी लागत आहे.

छोट्या व्यवसायाच्या येथील पाईपलाईन बदलुन येथील प्रश्न सोडवावा अशी नागरीकांच्या वतीने मागणी होत आहे. प्रशासनाकडून चेंबर तुंबल्यावर केवळ स्वच्छता केली जाते. दोन तीन दिवसानंतर पुन्हा या चेंबरची अवस्था जैसे थे होते. यामुळे नागरीकांना सांडपाणी व घाणीतुन मार्गक्रमण करण्याशिवाय पर्याय उरत नाही. त्या चेंबरच्या दुरूस्ती वारंवार आम्ही काम केली आहे. परंतू, सध्यस्थितीत दुरूस्तीचे काम नव्याने करण्यात येईल, असे कनिष्ठ अभियंता प्रिती यादव यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button